जिल्हा कृषी अधिकारी ह्यांना गाडीवर बसवून कृषी केंद्राची झाडाझडती
अकोला, दि. २१- जिल्ह्यात ऑनलाईन मध्ये २६०० मॅट्रिक टन उपलब्ध शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याने संतप्त वंचित बहुजन युवा आघाडी पदाधिकारी ह्यांनी आज प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे व महासचिव राजकुमार दामोदर ह्यांचे नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकारी ह्यांना घेराव घातला आणि जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावरील स्ट्रिंग ऑपरेशनचे व्हिडिओ दाखवून थेट गाडीवर बसवून कृषी केंद्रात धाव घेतली आणि गोडावूनचा पंचनामा करायला भाग पाडले. शेतकऱ्याची फसवणूक कराल तर अधिकारी ठोकून काढू असा इशारा देखील वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.ह्यापूर्वी १५ दिवसा पूर्वी सूजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात कृषी अधिकारी ह्यांना भेटून जिल्ह्यातील कृत्रिम खत टंचाई विरोधात उपाय योजना करण्याची मागणी करीत गोडावून ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.मात्र ३००० मॅट्रिक टन रासायनिक खते उलब्ध असताना शेतकऱ्याना साधा युरिया देखील मिळत नसल्याने युवा आघाडीने विविध कृषी केंद्रावरील स्ट्रिंग ऑपरेशन करीत त्याचे व्हिडिओ शूट करत ते आज जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे ह्यांना सादर करून धारेवर धरले.शासनाचे ऑनलाईन प्रणाली मध्ये २६०० मॅट्रिक टन साठा उपलब्ध असताना विविध केंद्रावर शेतकऱ्याना युरिया दिला जात नसल्याचे व्हिडिओ कॉल वर दाखवले.तातडीने जिल्हा कृषी अधिकारी कीरवे आणि जिल्हा परीषद कृषी विकास अधिकारी साळके ह्यांना कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर काढून दुचाकीवर बसवून संजय कृषी सेवा केंद्र येथे नेले.प्रत्यक्ष ४६ टन साठा ऑनलाईन दिसत असताना संजय कृषी सेवा केंद्र येथे एकही बॅग उपलब्ध नसल्याचे केंद्र संचालक ह्यांनी सांगितले.त्यावर जिल्हा कृषी अधिकारी ह्यांनी स्वत:चा परिचय देत त्याचे रेकॉर्ड तपासले असता आधार कार्ड आणि थंब व्हेरिफिकेशन शिवाय वितरीत केला असल्याचे सिद्ध झाले.पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी मोघाड ह्यांचे निर्देश नुसार आधार व्हेरिफिकेशन शिवाय वाटप करण्यात आले असे धक्कादायक माहिती केंद्र चालक ऑपरेटर ह्याने केले होते.गोडावून तपासणीत २३ पोते युरिया उपलब्ध असल्याचा पंचनामा करायला भाग पाडले.
जिल्हाभर कृत्रिम खत टंचाई असून शेतकऱ्याची लूट चालवली आहे.कृषी अधिकारी ह्यात सहभागी असून कमिशन घेत असल्याने शेतकऱ्यांची लूट चालवली आहे, कृषी विभागाने हे धोरण न बदलल्यास अधिकारी ठोकून काढण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे.
आंदोलनात ह्या वेळी वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर ,कोषाध्यक्ष दादाराव पवार , संघटकसमीर पठान ,मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, नितीन वानखडे, सचिन शिराळे, सुरेंद्र तेलगोटे,ॲड. सुबोध डोंगरे, उपाध्यक्ष,सचिव आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुणबी स्वप्निल आखरे जिल्हा सदस्य,आशिष मांगुळकर महानगराध्यक्ष, विकास सदांशिव,सुजित तेलगोटे कोषाध्यक्ष, शेखर इंगळे संघटक, विजय बोदळे उपाध्यक्ष, प्रवीण खंडारे उपाध्यक्ष, महेश शर्मा सचिव, आदित्य गायकवाड उपाध्यक्ष, वसीम शेख, आशिष सरपाते उपाध्यक्ष, मनोज इंगळे उपाध्यक्ष, महानगर अध्यक्ष जय रामा तायडे, उपाध्यक्ष, आकाश गवई उपाध्यक्ष , सूरज दामोदर, अक्षय वानखेडे, मिलिंद दामोदर अकोला तालुका अध्यक्ष, आकाश जंजाळ प्रसिध्दी प्रमुख अकोला, विवेक गवई उपाध्यक्ष जितेंद्र खंडारे सचिव, राहुल अहिर सचिव, रोशन धांडे , अतिश दामोदर , अजय खांडेकर. अरुण सोळंके. सिद्धू शिरसाट. ऋषिकेश म्हंडाशे. विजय सोळंके. अक्षय खांडेकर सुमित दामोदर. पक्षी राज चक्रनारायण धम्मा दामोदर. अमोल गवई. शिलवांत शिरसाट, ऋषिकेश खंडारे, प्रफुल वरटे विशाल गवई, शिरीष ओव्हाळ, रामा लाहुडकर,निशांत राठोड पदाधिकारी उपस्थित होते.