
स्थानिक : अकोला येथील बाळापूर मध्ये दिनांक ५ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातआंबेडकर यांनी
व्याळा येथील वंचित बहुजन आघाडी चे बाळापूर तालुका सह प्रसिद्धी प्रमुख
संदीप दामोदर यांच्या घरी सांत्वन भेट घेतली. त्यांच्या १२ वर्षीय मुलाचे दुर्धर आजाराने निधन झाले होते. हिंदुजा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला संपर्क करुन वैद्यकीय मदत करु असे आश्वासन दिले. संदीप माणिक वानखडे यांचे ब्लड कॅन्सर या आजाराने निधन झाले होते. या दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तेव्हा त्या दुःखात दोन्ही परिवारांना धीर दिला आणि दोन्ही कुटुंबांचे सात्वन केले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
