
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते झाला प्रवेश
अकोला- श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर व आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाच्या महिला पदाधिकारी व कोळी समाजातील महिलांनी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता महिला पदाधिकारी म्हणून सन्मानाने राजकारण हे फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच करता येते. तसेच महिलांना बरोबरीनी राजकीय वाटा हा वंचितमधे मिळत असल्याने भाजपाच्या तालुका सचिव सौ. छाया केशव लांडे यांच्यासह कोळी समाजातील महिला पदाधिकारी सौ. मंदा शिवदासजुवार, तुळसा गजानन चिपडे, रेखा सुभाष मंडासे, सुमन सुरेश राणे, मंगला प्रकाश कोलटक्के, विमल महादेव मेहरे, संगीता वसंता राणे, मनिषा पुंडलिक मुंडासे, प्रमिला बाबाराव भगत, शिला अशोक मंडासे, मिनल निलेश राणे, विद्या अंबादास घावट, मुक्ता मंगेश टाकसाळे, सुनिता अंबादास कोलटक्के, मुक्ता लक्ष्मण मंडासे, वर्षा संतोश घुगरे, कल्पना जयदीप कोलटक्के, पद्मा गज्ञानन राणे, मंगला संतोश कोलटक्के या महिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते व महिला तालुकाध्यक्ष तथा अकोला पं. स. गटनेत्या सौ. मंगलाताई शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि. प. अध्यक्ष संगीताताई आढावू, माजी जि. प. अध्यक्ष तथा विद्यमान जि. प. सदस्य सौ पुष्पाताई इंगळे, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, जिल्हा महासचिव शोभाताई शेळके आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
