
जिल्हा कृषी अधिकारी ह्यांची भेट देऊन दिला अल्टिमेटम..
अकोला – शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची कृतीम टंचाई निर्माण करुन ती खते चढ्या भावाने विकल्या जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ह्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीकडे केल्याने वंचित बहुजन आघाडीचे युवानेते मा. सुजातदादा आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांनी आज दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी अकोला जिल्हा कृषी अधिकारी श्री. किरवे यांची त्यांच्या शासकीय कार्यालयात जावून भेट घेतली. “अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन व प्रशासनाला अजुन जाग आली नाही. फक्त खोटी आश्वासने ह्या त्रिकुट सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान संदर्भात दिली असतांनाच त्यात शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची मोठ्या प्रमाणात गोडाऊन मधे माल साठवून कृतीम टंचाई निर्माण केली आहे. आणि या टंचाईचा फायदा घेत अनेक कृषी सेवा केंद्रावाल्यांनी खतांची चढ्या भावाने विक्री करुन हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकल्यासारखा प्रकार करत आहे.” हा प्रकार आपण आपल्या स्तरावरून आदेशित करुन तात्काळ थांबवावा व साठवणुक केलेल्या खताला शेतकऱ्यांना शासकीय किमतीत उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी हे अश्या गोडाऊनवर ताबा शेतकऱ्यांना स्वतः खते वाटप करेल असा अल्टिमेटम जिल्हा कृषी अधिकारी श्री किरवे यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आद. सुजातदादा आंबेडकर यांनी दिला.

ह्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, संघटक समीर पठाण, सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, कोषाध्यक्ष दादाराव पवार, मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, उपाध्यक्ष नासरी ताई चव्हाण, निलेश इंगळे, ॲड. सुबोध डोंगरे, सचिव आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुणबी, आदित्य इंगळे, ॲड. मिनल मेंढे, सुजित तेलगोटे, अकोला पुर्व महानगर अध्यक्ष जय रामा तायडे, अकोला पश्चिम महानगर अध्यक्ष आशिष मांगुळकर, तेल्हारा तालुकाध्यक्ष झिया शहा, मीता. महासचिव संदिप गवई, मयूर सपकाळ, निशांत राठोड,नंदु मापारी,स्वप्नील वाघ,सचिन सरकटे, बाळापूर तालुकाध्यक्ष संदीप वानखडे उपाध्यक्ष विशाल दंदी,प्रसिद्धी प्रमुख रणजीत तायडे,तालुका उपाध्यक्ष राजदार खान,तालुका उपाध्यक्ष अक्षय साबळे, सचिव नागेश डोंगरे, वाडेगाव शहर मोईन खान दिलदार खान, (अध्यक्ष) विशाल डोंगरे,(उपाध्यक्ष) जयवर्धन डोंगरे,(संघटक) रामा लाहुडकर (सचिव ) विकास इंगळे (सचिव) राजेश जंजाळ ( प्रसिध्दी प्रमुख) वंचित बहुजन युवक आघाडी,(उपाध्यक्ष) अकोला जिल्हा,वंचित बहुजन युवक आघाडी, माजी,सचिव सुगत डोंगरे , सुमित डोंगरे, अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, तालुका सचिव जितेंद्र खंडारे, तालुका उपाध्यक्ष विवेक गवई, तालुका सचिव राहुल अहिर, सचिव रोशन धांडे, अमोल जमनीक,अक्षय राठोड, अनंत इंगळे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा,तालुका,महानगर,पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.