
काळे झेंडे दाखवून दर्शविला विरोध
अकोला:
काल दिनांक 30 जुलै रोजी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा अकोला शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन युवक आघाडी अकोला महानगर यांच्या वतीने त्याचा निषेध करण्याकरिता वाशिम बायपास या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याची माहिती मिळताच संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी त्यांच्या मार्गात बदल केला व इतर मार्गाने पळाले ही खऱ्या अर्थाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची धाक आणि ताकद याची माहिती संभाजी भिडे याला पूर्वीच असावी म्हणूनच तो मार्ग सोडून पळाला आणि इतर मार्गाने लपून कार्यक्रम स्थळी पोहोचले असे सांगत वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून भिडेंचा निषेध केला.
यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी अकोला महानगर पश्चिमचे अध्यक्ष आशिष मांगुळकर, महासचिव कुणाल राऊत ,कोषाध्यक्ष सुजित तेलगोटे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे, उपाध्यक्ष मनोज इंगळे ,उपाध्यक्ष आशिष सरपाते, संघटक शेखर इंगळे, महानगर सचिव शिरीष ओहळ , बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, अंकित श्रीनीवास, प्रसन्नजीत रगडे, आदित्य गायकवाड, अंकुश तायडे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.