राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश आदर्श लोकशाहीवादी नागरिक घडवणे – डॉ. संजय शेंडे

शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह संपन्न

अकोला :- श्री शिवाजी महाविद्यालय वक्तृत्व- वादविवाद समिती तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक केंद्र श्री शिवाजी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताह, दिनांक 26 ते 28 जुलै 2023 रोजी राबविण्यात आला यामध्ये ‘व्याख्यान‘ , ‘निबंध स्पर्धा‘ तथा ‘वक्तृत्व स्पर्धा‘ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 26 जुलै रोजी उपरोक्त विषयावर व्याख्यान घेण्यात आले या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट तर प्रमुख वक्ते म्हणून इलेक्ट्रॉनिक विभागाचे तथा विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. संजय शेंडे यांनी मार्गदर्शन केले ते पुढे बोलताना म्हणाले – ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश आदर्श लोकशाहीवादी नागरिक निर्माण करणे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून व्यावसायिक अभिरुद्धी वाढवणे व स्वतःच्या पायावर त्याला भक्कमपणे उभे करणे” अशा राष्ट्रीय धोरणाच्या सकारात्मक बाजू त्यांनी सक्षमपणे मांडल्या आणि केजी ते पीजी म्हणजेच नर्सरी ते संशोधकांनी पीएचडी पर्यंत अभ्यासक्रमात झालेल्या बदललाचे स्वरूप त्यांनी सविस्तरपणे विशद केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी विचार व्यक्त करताना ते म्हणाले ‘कोणतेही नवीन

धोरण स्वीकारणे अवघड व गैरसोयीचे वाटत असते परंतु सांप्रत परिस्थिती बदलायची असेल तर अशा प्रकारच्या नवीन नवीन बदलाला सकारात्मकपणे स्वीकारणे कर्मप्राप्त आहे‘. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. श्रद्धा थोरात, वाणिज्य विभागाचे डॉ. संजय तिडके,डॉ. संजय पोहरे ,डॉ.संतोष बदने डॉ. अस्मिता बडे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन मोहोड, यांनी संचालन डॉ. महेश पवार तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.