रिधोरा गावच्या सरपंच पदी सेना वंचित बहुजन आघाडी युतीचे विशाल दंदी

स्थानिक: अकोला तालुक्यातील रिधोरा गावच्या सरपंच पदी सेना वंचित बहुजन आघाडी युतीचे विशाल दंदी यांची निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुधीर काळे यांनी दिली. सरपंच पदासाठी ७ जून रोजी निवडणूक घेण्यात आली होती.

रिधोरा ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. खुल्या प्रवर्गातून विशाल दंदी, राजाभाऊ देशमुख आणि पवन अग्रवाल यांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत अग्रवाल यांनी माघार घेतल्यानंतर विशाल दंदी आणि राजाभाऊ देशमुख यांचे अर्ज कायम होते. निवडणूकीत विशाल दंदी यांना सहा तर राजाभाऊ देशमुख यांना पाच अशी मते मिळाली. काही दिवसांपूर्वी माजी सरपंच संजय अघडते यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. २०२१ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ११ उमेदवार हे सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडून आले होते. यावेळी संजय अघडते हे सरपंच होते. यानंतर आज झालेल्या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचितच्या विचारांच्या सहा सदस्यांनी एकत्र येत ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता स्थापन केली. गुप्त मतदान पद्धतीने निवडणुक
झाल्याने सर्वाधिक मते विशाल दंदी यांना मिळाल्याने ते विजयी झाले. यावेळी ग्रामसेवक सुधीर काळे पोलीस पाटील सुजय देशमुख उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सभासदांमध्ये संजय अघडते, मंगेश गवई, उषा वाडकर, राजाभाऊ देशमुख, पवन अग्रवाल, वैशाली दंदी, शारदा खंडारे, पुजा दांदळे, कुंदन चौधरी व उमा तेलगोटे हे उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचीत सरपंचाचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.