अक्षय भालेराव याची जातीवादी गावगुंड्यांनी केलेल्या निर्गुण हत्येचा सम्राट अशोक सेनेकडून तीव्र निषेध..

अकोला: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वप्रथम जयंती साजरी केली म्हणून,नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील भीमसैनिक अक्षय भालेराव याची जातीवादी गावगुंड्यांनी निर्गुण हत्या केली,या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून तीव्र निषेध करतो,नवरदेवाची मिरवणूक काढली जाते, खंजीर,तलवार घेऊन नाचवल्या जाते,डीजे बेधुंद अवस्थेत सुरू असते.अक्षय भालेराव ला गाठून मारले जाते.लाईट बंद करून बौद्ध वस्तीवर दगडफेक केल्या, महिलांना सुद्धा बेदम मारहाण केली,पोलिसांनी अशा मिरवणुकीला का रोखले नाही.पोलीस स्टेशनच्या एक किलोमीटर वरील हा नंगानाच पोलिसांनी रोखला असता तर अक्षय भालेराव हत्याकांड झालं नसतं बौद्ध वस्तीवर दगडफेक झाली नसती,गावातील पोलीस पाटील काय करत होता?.सरपंच काय करत होता?.या लग्नाच्या मिरवणुकीत हत्यार काढून मिरवणूक सुरु आहे ही कल्पना पोलिसांना का दिली नाही.की पोलिसांनीच या गावगुंडांना मदत केली म्हणून यांनी हत्या केली, यामागे कोणकोणते पोलीस अधिकारी व राजकीय नेते आहेत की ज्यांनी हे हत्या केली.

अक्षय भालेराव आणि सर्व तरुणांनी पहिल्यांदा या गावात भिमजयंती प काढली. आजवर तिथे जयंती झाली नव्हती ते गाव किती जातीयवादी आहे बाबासाहेबांची जयंती त्या ठिकाणी होऊ देत नाहीत, ज्यांनी या देशाला संविधान दिले माणसाला माणुसकीचा अधिकार दिला त्यांची जयंती होऊ देत नाही हा देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले तरीसुद्धा आजही, आम्हाला स्वतंत्र आहे की नाही.?. हा देश सविधानवादी आहे की हुकूमशाहीवादी.?. खुलेआम हत्याकांड होते,अक्षय भालेराव चा खून कोणाच्या इशारावर केला,या घटनेमागे कोण आहे,पोलीस यंत्रणा या गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे का,हा चार्ज सीबीआय कडे देण्यात यावा आरोप यांवर अट्रोसिटी ॲक्ट,302 अंतर्गत प्लॅनिंग मध्ये 120 ब चा सुद्धा समावेश करावा आणखी कोण कोण आरोपी आहेत त्यांना सुद्धा 34 मध्ये हकदार करावे.प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.अक्षय भालेराव हा आई-वडिलांचा सहारा होता ते आता बे सहारा झाले त्यांना सरकारी नोकरी देण्यात यावे व अक्षय भालेराव च्या कुटुंबांना 50 लाखाची मदत देण्यात यावी आरोप यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तात्काळ हा तपास सीबीआयकडे देण्यात यावी, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी आमच्या हत्या झाल्या याकडे लक्ष द्यावे नाहीतर राजीनामा द्यावे अशी सम्राट अशोक सेनेकडून मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.