
अकोला: अंत्यंत हलाकीच्या परिस्थितीवर मात करत वडिलांनी मोलमजुरी करून आपल्या मुलीला शिकविले. मुलीनेही वडिलांच्या कष्टाचे चीज करुन दाखवले. जिजाऊ कन्या विद्यालय अकोला येथे दहावीत शिकत असलेल्या कु. सानिया नागसेन इंगोले हिने कुठलीही टिवशन न लावता नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या परिक्षेत 80.60% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. भविष्यात तिला शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर पोहचुन सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सोयीचे व मोफत शिक्षण करण्याची इच्छा आहे. तीच्या या यशाबद्दल तीच्या शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिचा सन्मान केला आहे. या यशाचे श्रेय ती आपली शिक्षिका कु वर्षा चापे मॅडम व आई सौ. जयशीला इंगोले आणि वडील नागसेन इंगोले यांना देते.