
पत्रकार परिषदेत दिली माहिती
स्थानिक: अकोला येथे दि. १३ मे २०२३ रोजी रात्रीला अकोला शहरात जातीय दंगल निर्माण करणे दोन समाजात तेढ निर्माणकरून शांतता व सुव्यवस्था भंग करणा-या ख-या गुन्हेगारांना सोडून निरअपराध लोकांना गुन्ह्या मध्ये अडकविण्यात आले असल्याचे आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महानगर समन्वयक डॉ प्रा. संतोष हुशे यांनी केले.
सदर दंगलीमध्ये विलास महादेव गायकवाड गरीब व कष्टाळू कुटुंब प्रमुख यांचा नाहक बळी गेला. गायकवाड यांच्यापाठीमागे पत्नी व दोन मुले, एक मुलगी असा परिवार असून संपुर्ण परिवार हा दहशती खाली आहे. विलास गायकवाड यांचे मारेकरी कोण व त्यांच्या मारेक-यांना अद्यापर्यत का पडकण्यात आले नाही अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे. खरे गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कार्यवाही करून शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रीत करावी. तसेच शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रशासनाला सहकार्य करेल असेही मत त्यांनी व्यक्त केले.
तेव्हा जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, माजी गटनेते गजानन गवई, महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, ओबीसी नेते दिपक बोडखे, रुग्णसेवक नितीन सपकाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, तालुका महासचिव शरद इंगोले आदी उपस्थित होते.