
अकोला, दिनांक २५ -जनहितार्थ राजकीय सामाजिक आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासननिर्णय असतांना गुन्हे परत घेतले जात नसल्याने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित युवा आघाडीने ३ मे रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई येथे एल्गार मेळावा आयोजित केला असून युवक प्रदेश अध्यक्ष डाॅ. निलेश विश्वकर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा युवा एल्गार पुकारला जाणार असल्याचे युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे व खटले मागे घेण्यासाठी वंचित बहूजन युवा आघाडी एक्शन मोड वर असून राजकीय सामाजिक गुन्हे परत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कुठल्याही राजकीय सामाजिक आंदोलने ह्यातील सर्वच राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्त्यां वरील गुन्हे परत घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन करण्यात आल्याची घोषणा वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.सार्वजनिक हिताच्या समस्यां व अन्याय अत्याचाराचे घटना घडल्यानंतर राजकीय व सामाजिक संघटना बंद पुकारतात, घेराव घालतात, निदर्शने करून आंदोलन केले जाते.त्यात दाखल गुन्हे मध्ये प्रामुख्याने खैरलांजी पासून ते रमाबाई आंबेडकर नगर, कोरेगाव भिमा, ३ जानेवारी बंद, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर कोणत्याही आंदोलनात आंदोलकाच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे हे राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे असल्याने ह्या गुन्ह्यातील खटले तपासाअंती मागे घेण्याची तरतूद महाराष्ट्र शासन गृह विभागाने वेळोवेळी काढण्यात आलेल्या अनेक शासन निर्णयात नमूद आहे.कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) तीन जानेवारी बंद आणि मराठा क्रांती मोर्चासह अगदी आरे जंगल आंदोलन आणि कोविड काळा सहित इतर सर्व राजकीय सामाजिक आंदोलने यातील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासन निर्णय असून सुद्धा सदर गुन्हे परत घेतले गेले नाहीत.त्यात दि.१ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे गुन्हे आणि खटले परत घेणे बाबत तसेच मराठा क्रांती मोर्चा प्रकरणात देखील गुन्हे परत घेण्याची तरतूद आहे.हे गुन्हे काढून घेतांना केवळ दोन अटी घालून हे सर्व गुन्हे व खटले काढले जाऊ शकतात.ह्यासाठी वंचित युवा आघाडी राज्य पातळीवर मोहीम उभी करणार आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ज्या राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्या विरुद्ध आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत.त्या सर्व पक्षाचे किंवा संघटना ह्यांचे कार्यकर्ते अनेक वर्षे पोलीस आणि न्यायालयात वाऱ्या घालत असतात.ह्याची दखल कुठल्याही राजकीय पक्ष घेत नाही.सत्ताधारी पक्ष शासन निर्णय काढून मोकळे होतात, त्याचे अंमलबजावणी बाबत गंभीरपणे प्रयत्न होत नसल्याने कार्यकर्ते भरडले जातात.त्यामुळे वंचित युवा आघाडीने आवाहन करीत जुन्या नव्या सर्व गुन्ह्याची माहिती, एफ आय आर नंबर, न्यायप्रविष्ट असल्यास कोर्ट केस नंबर, सर्व आरोपींची नावे मोबाईल नंबर व गुन्ह्यात दाखल केलेली कलम ह्या सहित माहिती मागवली आहे.तसेच गुन्हे किंवा खटले काढून घेण्यासाठी राज्यपातळीवर आयोजित युवा एल्गार मेळावा साठी आंदोलकांना निमंत्रित केले आहे.
दि. ०३ मे २०२३ रोजी, दुपारी १२:०० वा. स्थळ :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथेखैरलांजी,भीमा कोरेगाव, रमाबाई आंबेडकर नगर प्रकरण, ३ जाने. बंद, मराठा क्रांती मोर्चा किंवा कुठल्याही राजकीय, सामाजिक आंदोलन मधील गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी आपल्या गुन्ह्याच्या माहिती सोबत “युवा एल्गार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा आघाडी पदाधिकारी डॉ. निलेश विश्वकर्मा ( प्रदेशाध्यक्ष ) ९४२०१२३५५५राजेंद्र पातोडे ( महासचिव ) ९४२२१६०१०१राज्य पदाधिकारी – अमित भुईगळ – 9890054294, शमीभा पाटील – 8080243508, ऋषिकेश नांगरे पाटील – 9423005456, अक्षय बनसोडे – 7083306577, चेतन गांगुर्डे – 8637740275, विशाल गवळी – 8698129855, अफरोज मुल्ला – 8806078699 सूचित गायकवाड – 7768050143, विनय भांगे – 9766630001, अमन शादाब धांगे – 7875955786, अमोल लांडगे – 9890238837वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने केले आहे.