पातूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी..

पंचशिल नगर येथील महिलांचे लेझीम पथक ठरले आकर्षण…

अकोला, पातूर : 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विविध उपक्रमांसह शहरातील विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या. याप्रसंगी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पातूर शहरात सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीच्या वतीने भिमजयंती निमित्त विविध उपक्रमांसह भिमजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.

१४ एप्रिल रोजी सर्वसामान्य आंबेडकर प्रेमींनी अभिवादनासाठी पातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, भिमनगर येथे सकाळपासून गर्दी केली होती. त्यानंतर संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान भिमनगर पातूर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पंचशील ध्वजारोहण व बुद्धावंदना घेऊन मिरवणुकीला सुरुवात होऊन म.फुले नगर,बाळापूर वेस येथून कान्होबा चौक, मिलिंद नगर, गुरुवार पेठ,सिद्धार्थ नगर,पोलीस स्टेशन चौक,बाळापूर रोड येथून होऊन म.फुले स्मारक,संभाजी चौक येथे महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून सदर मिरवणूक बाळापूर रोड मार्गे महात्मा फुले नगर,बाळापूर वेस पातूर येथे समारोप झाला.यावेळी भिमजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत भीमशक्ती व्यायाम शाळा,भिमनगर पातूर, मिलिंद नवयुवक मंडळ व भिमज्योत व्यायाम शाळा, पंचशील नगर यांनी विविध देखावे सादर केले.

सदर मिरवणूकित पंचशील नगर येथील भिमज्योत व्यायाम शाळा, पंचशील नगर येथील महिला लेझीम पथक आकर्षण ठरले. पातूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या हर्षोल्हासात मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मिरवणूक सोहळ्या मध्ये पातूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. हरिष गवळी, उपनिरीक्षक मा.हर्षल रत्नपारखी, यांचा मिरवणूकी मध्ये कडक व चोख बंदोबस्त होता.तसेच विकास जाधव,राठोड मेजर,भवाने मेजर,अभिजित असोलकर, सर्व पोलीस कर्मचारी, महिला होमगार्ड आदी पोलीस यंत्रणा बंदोबस्ता करिता मोठया प्रमाणात सज्ज होत्या. नेहमीच सण – उत्सवामध्ये पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन युवा आघाडीचे अविनाश पोहरे, अर्जुनसिंह गहिलोत,पवन सुरवाडे, करण राठोड, आशिष राठोड,निखिल उपर्वट,संदेश चव्हाण,तुषार शिरसाठ,गौरव सदार,आकाश करवते, राज देशमुख आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.