राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे वार्ड क्रमांक १८ मधिल पाण्यापासून वंचित

अकोला प्रती – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या हलगर्जीपणामुळे वार्ड क्रमांक १८ मधिल नागरीक पाण्यापासून वंचित राहत आहेत सदर प्रकरण असे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने वाशिम बाय पास रोड वर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम करत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या हलगर्जीपणामुळे महानगरपालिकेची नळाची पाईप लाईन दोन तिन ठिकाणी फुटली असुन पिण्याचे पाणी पुर्णपणे वाया जात असून तिन दिवसांपासून वार्ड क्रमांक १८ मधिल नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या कर्मचाऱ्यांनी जागोजागी मोठ मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी रितसर तक्रार केली असुन तिन दिवसांपासून बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करुन नळाची फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.