सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे दिल्लीचे मा.सामाजिक न्याय मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते सन्मानित

अकोला प्रती – नुकताच आबासाहेब खेडकर सभागृहात सम्राट अशोक पर्व महोत्सव पार पडला.दिल्लीचे मा सामाजिक न्यायमंत्री ॲड.राजेन्द्रपाल गौतम हे सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित अशोकपर्व महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वयाच्या सोळाव्या वर्षी पासुन सामाजिक कार्यात कार्यरत व रुग्णसेवक म्हणून रुग्णांची निस्वार्थीपणे सेवा करणारे उमेश सुरेशराव इंगळे यांना शाल श्रीफळ व समाजरत्न सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले 31मार्च 2023 ला पू महाथेरो ज्ञानज्योती यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सम्राट अशोक पर्व महोत्सव निमित्ताने आबासाहेब खेडकर सभागृहात धम्मक्रांती,आंबेडकरी सामाजिक धार्मिक ,शैक्षणिक, पत्रकारिता,साहित्य , इत्यादी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते प्रियदर्शी अशोकरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रदीप चोरे, डॉ संतोष पेठे ,प्रा डॉ मंगला बोराडे,प्रा डॉ देवलाल आठवले ,दगडु वाहुरवाघ ,ऍड देवानंद गवई, मंदाताई सिरसाठ डॉ संतोष तायडे, तहसीलदार राहुल तायडे ,आकाश पवार,ऍड संतोष बोरे ,निरंजन वाकोडे इत्यादीची उपस्थिती होती यावेळी प्रबोधन कार्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील बौद्ध विहारे,तसेच महिला उपासीका संघ ,उपासक संघ यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती या सत्काराबद्दल उमेश सुरेशराव इंगळे यांनी मंदाताई सिरसाठ यांचे विशेष आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published.