
भारताचे महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कालखंडात भारताला जगभर गौरव प्राप्त झाला होता,सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय अश्या सर्व क्षेत्रात भारताची भरभराट झाली होती,समृद्ध भारत घडवून भारताला जागतिक महासत्ते्चा सन्मान सम्राट अशोक यांनी मिळवून दिला असे प्रतिपादन पू. भंते ज्ञानज्योती महाथेंरो यांनी केले चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोला द्वारा खेडकर सभागृह अकोला येथे आयोजित अशोक पर्व कार्यक्रमात द्वितीय सत्रात सम्राट अशोक कालीन स्वर्णीम भारत या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक प्रतिष्ठान चे संस्थापक प्रा डॉ संदीप भोवते हे होते तर प्रा विजय आठवले अध्यक्ष, प्रा. सुनील कांबळे सचिव प्रा. डॉ बाळकृष्ण खंडारे , उपाध्यक्ष प्रा शैलेश इंगळे ,बी.जी.इंगळे ,निरंजन भाऊ वाकोडे विद्याधर मोहोड,अनिल गवई वासुदेव गवई रोहित जगताप,मंदाताई शिरसाट,कल्पना महाले,कल्पना खंडारे वर्षा ताई जंजाळ,सुशीला दामोदर, सुधा दारोकार ,उज्वला नरवाडे,वंदना रावळे,शोभा गुडध ,प्रेरणा चक्रणारायन,विशाखा भगत इत्यादी मान्यवरांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बुद्ध,सम्राट अशोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना पठण करण्यात आले पुढे बोलताना भंते ज्ञानज्योती यांनी धम्म चळवळ प्रतिकांतीच्या फेऱ्यात अडकली असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे यांनी प्रास्ताविक प्रा सुनील कांबळे यांनी तर आभार अनिल गवई यांनी मानले