
स्थानिक: अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे 23 ते 28 मार्च 2023 रोजी इंग्रजी भाषेतील संभाषण कौशल्य या विषयावर एका आठवड्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रतिष्ठित संस्थांमधील नामवंत तज्ञ प्राध्यापकांनी संभाषणाच्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि संवाद साधला. त्यामध्ये डॉ.गजानन मालोकर, प्रा.राहुल गावंडे, प्रा.डिंपल मापारी, डॉ.अनघा सोमवंशी, श्री.मेघराज गाडगे, श्री.नीलेश मुरुमकर यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.कार्यशाळेचे उदघाटन प्रा.व्ही.टी. हजारे यांच्या हस्ते झाले.
चाळीसगाव, नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटीचे डॉ. एस.डी. महाजन यांनी कार्यशाळेत केलेल्या भाषणात महाविद्यालयाने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले, प्राचार्य डॉ. ए.एल. कुलट यांनी विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाचा उल्लेख केला आणि संवाद विषयावरील आठवडाभर चाललेल्या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या यशाचा अभिप्राय हा उत्तम पुरावा आहे असे म्हटले. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एन.एस. तिडके यांनी यशस्वी टीमवर्कसाठी सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ.डी.बी.वानखडे, आयोजन समितीचे सदस्य डॉ.के.व्ही.म्हैसणे, डॉ.ई.डब्ल्यू.खेडकर, डॉ.बी.के.ढोरे, डॉ.पी.आर.वाघमारे, प्रा.अर्चना देशमुख, प्रा.व्ही.व्ही.निंबाळकर, डॉ. अस्मिता बढे, प्रा. सुशीला मळसने आणि डॉ. ए.पी.सोमवंशी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.