लोहगाव परभणी येथे डॉक्टराने रुग्णावर केला चुकाचा उपचार

रुग्णांच्या नातेवाईकांकडून वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे करणार तक्रार

स्थानिक: परभणी येथे असणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्र आणि अंधश्रध्दा निर्मूलन केंद्रावर एका रुग्णावर सल्लागार मनोविकार तज्ञ असणारे डॉ. किशोर सोनी लोहगावकर यांनी चुकीचा उपचार केल्याचे रुग्णाच्या नातेवायीकांकडून सांगण्यात येत आहे. व्यसनमुक्ती केंद्र हे गंगाखेड रोडवर सिगनापुर फाटा मार्गे लोहगाव येथे आहे. अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या उपचार केंद्रावर रुग्ण भारत बापूराव मेश्राम गेले असता त्यांना आजारासाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा दुष्परिणाम झाल्याने रुग्णाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जेव्हा नातेवाईकांनी याची चौकशी केल्या असता डॉ. किशोर लोहगावकर यांनी पळवापळवी चे उत्तर देत जबाबदारीपासून पळ काढत आहे. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून आरोग्य मंत्री पोलीस स्टेशन आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे तक्रार करण्याचे सांगितले. सध्या ओझोन हॉस्पिटल आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घरची परिस्थिती हालाखालीची असून ते या परिस्थितीवर मात करण्यासाठी झगडत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.