स्थानिक /अकोलाउच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे राज्यस्तरीय प्रेरणा 2022 या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये अकोल्यातील श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सायली गोतमारे याची निवड सदर शिबिराकरिता करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांची नेतृत्व गुण विकास करणे, व्यक्तिमत्व विकास व अनेक रोजगाराच्या संधी व्यासपीठ नेतृत्व इत्यादी कार्यक्रम या शिबिरात पाच दिवसात घेण्यात येणार आहे या शिबिराकरिता सायली गोतमारे याची निवड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.
त्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, आय. क्यू.एसी. समन्वयक डॉ. आशिष राऊत विज्ञान विभाग समन्वयक डॉ.संजय शेंडे वाणिज्य विभाग समन्वयक डॉ.संजय तिडके मानव विद्याशाखा समन्वयक डॉ जीवन पवार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन भुतेकर महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.कांचन कुंभलकर सह-कार्यक्रम अधिकारी प्रा महेश फलके प्रा. वैशाली ठाकरे विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी आसेकर यांनी सायली गोतमारे चे अभिनंदन केले.