
शाहीर संभाजी भगत यांच्या बाबासाहेबांवरील गीताने श्रोत्ये मंत्रमुग्ध झाले.
स्थानिक- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे नुकतेच महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांचे व्याख्यान संपन्न झाले तेव्हा ते बोलताना म्हणाले- ‘‘प्राचीन काळांपासून विचारांचा संघर्ष सुरू आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती घडत आहे. जाती-धर्माच्या पुढे जाउन महापुरूषांच्या मानवतावादी विचाराने पुढील पिढीसाठी कार्य करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातून म.फुल्यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा घेतली असावी. तो विचार पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळात स्त्रियांच्या राजकीय संघटनेतून क्रांती घडेल’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाहीर संभाजी भगत यांच्या बाबासाहेबांवरील गीताने श्रोत्ये मंत्रमुग्ध झाले. यावेळी हारर्मोनियम वादक प्रा.हर्षवर्धन मानकर यांनी आणि ढोलक वादक चि.इंगळे यांनी त्यांना साथ दिली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून विधान परिषदेचे आमदार मा.अमोल मिटकरी, मा.संदिप फुंडकर, शेतकरी जागर मंचाचे मा.प्रशांत गावंडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ.आशिष राउत हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाहीर संभाजी भगत यांचा सत्कार व स्वागत वीर मोहिते लिखित डॉ.पंजाबदाव देशमुख यांचा चरित्र ग्रंथ भेट देवून प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी केला. प्रमुखवक्त्यांचा परिचय प्रशात गावंडे यांनी करून दिला तर मा.अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात शाहीर संभाजी भगत यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर पोवाडा, चित्रपटाची निर्मिती करावी. असे भावनिक आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कुलट म्हणाले ‘बदलत्या काळात महापुरूषांना अपेक्षित शिक्षणाचा मूळ अर्थ संपायला नको’.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.सचिन भुतेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अश्वीनी बलोदे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विवेक हिवरे, डॉ.जीवन पवार, डॉ. चेतन राउत, डॉ.किशोर देशमख, डॉ. सोपान वतारे, डॉ. आनंदा काळे, डॉ. नानासाहेब वानखडे, डॉ. संजय पोहरे, प्रा. राज सालोडकर, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. संतोश बदने, श्री प्रकाश बागडे, रजिष्टार श्री अशोक चंदन, श्री राजेश गीते, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.