
अकोला: दी ०३जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मेस्का सिक्युरिटी गार्डश्री नाचणकर यानी वंचित बहुजन युवा आघाडी पुर्व महानगर संघटक रितेश यादव याला शिवीगाळ करत मारहाण केली आणि पुन्हा मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणाची सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.तसेचजिल्हा सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता यांच्या कडे तक्रार देण्यासाठी गेले असता कोणत्याही प्रकारची दखल न घेण्याचे दिसताच युवा आघाडी कार्यकर्त्यांनी दालणा समोर ठ्ठीया दीला.त्यानंतर प्रशासन टाळ्यावर येऊनप्रभारी अधिष्ठाताडॉ आडे यांनी तक्रार घेऊन चौकशी समिती बसवून कारवाई करण्याचे आश्वासन युवा आघाडी कार्यकर्त्यांना दीले.मेस्का सिक्युरिटी गार्ड यांच्या गणवेशाला नेम प्लेट नसते,वृध्द रूग्णांना एकेरी उल्लेख करणे,अशा अनेक तक्रारी यावेळी करण्यात आल्या.या प्रकरणी जर योग्य कारवाई न झाल्यास युवा आघाडी पुन्हा अधिष्ठातांच्या दालनात ठीय्या आंदोलन करेल असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांनी यावेळी दीले.
या आंदोलनात जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,पुर्व महानगर अध्यक्ष जय रामा तायडे,कुणाल राऊत, रितेश यादव, नितीन सपकाळ, सचिन डोंगरे, हितेश जामणीक, आशिष गोपनारायन, नितीन प्रधान, धीरज इंगळे , मंगेश सावंत, राजेश बोदळे , सोनू शिरसाट, रणजीत तायडे, गोलू खिल्लारे, कुमार शिरसाट, अक्षय डोंगरे , कुणाल शिरसाट, ऋतिक खंडारे, रणजीत लांडे, शुभम हिवाळे, स्वप्नील बागडे, धम्मा तायडे, सचिन पाचपोर, गोलू शिरसाठ, करण थंकेकर, सुजय दंडी, पवन गवई, लवेश वरघत ,विठ्ठल परेकर, आकाश सोनोने, उमेश बहेर, रणवीर पडगण, इत्यादी कार्यकर्ते उपस्तीत होते.