
स्थानिक –
नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालित जिजामाता कला महाविद्यालय दारव्हा येथील राष्ट्रीय सेवा योजना व आय क्यू एसी यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एक.पी.जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रीती ठाकरे व प्रमुख उपस्थित प्रा.कु.रुपाली कणसे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांचे विचार आज समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून विज्ञानवादी कसे होते व अंधश्रद्धेवर प्रहार कसे केले याची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठाचे नाव संत गाडगेबाबा हे त्यांच्या कार्यकर्तुत्वावरून कसे ठेवण्यात आले याची जाणीव करून दिली. तसेच अध्यक्षीय भाषणांमधून डॉ. जाधव यांनी संत गाडगेबाबांनी गावागावात जावून स्वच्छतेचा मुलमंत्रित देऊन दशसूत्री कशी समजून सांगितली व त्या दशशत्रीच्या आधारावर प्रत्येक मानवाने जीवन जगले पाहिजे सोबतच आजच्या या कार्यक्रमातून आपण गाडगेबाबांच्या एखाद्या विचाराचे पाईप तरी झालो तरी या कार्यक्रमाचे फलित झाले असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे गाडगे महाराजांच्या विचाराने आपण चाललो पाहिजे अशी अपेक्षा याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे संचालन कु. मनीषा सार्वेने केले तर कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम बांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिव्यां निवारेनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. रमेश खंडारे, डॉ. जयवंत जुकरे, डॉ.राजेश गेडाम, नितेश कदम, सचिन माटोळे, सतीश सरतापे,सोमराज लोहकरे, विनोद कंठाळे, सोमराज लोहकरे, वैशाली इंगोले ,प्रणिता उघडे, साक्षी देशकरी, हरीओम जामोदे, राहुल डफळे, शुभम नांदेडकर, अजय चव्हाण, राधा उघडे ,राधा बगमारे, पूजा राठोड, माधुरी राठोड, राणी राठोड, राणी घोडे, दिव्यांनी ठोके अश्विनी रुडे, विशाखा जाधव, विशाखा कोल्हे, अंकिता राठोड आदींनी परिश्रम घेतले.