सर्वसामान्य माणूस ते थेट जनतेतून सरपंच*दिगंबर पिंप्राळे यांनी केली अजब किमया

अकोट :

तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आकोलखेड ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदी वंचित बहुजन आघाडीचे दिगंबर पिंप्राळे यांचा विजय झाला आहे.तर सेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्या मातोश्री चा दारुण पराभव झाला आहे.पिंप्राळे यांना १८९२ मते मिळाली तर निचळ यांना १४४९ मते मिळाली डीएसपी यांचा सर्वाधिक ४४३ मतांनी विजय झाला.मागील वर्षी पिंप्राळे यांनी अकोलखेड पंचायत समितीची निवडणूक लढविली होती.त्यामध्ये त्यांना समान मते मिळाली होती.दिगंबर पिंप्राळे यांनी सरपंच पदाकरीता निवडणूक लढविताना एक रुपया देखील खर्च केला नाही.त्यांच्यामागे असलेली जनशक्ती मतांच्या रुपाने दिसून आली.पिंप्राळे हे घर,दार,विज नसलेले महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार होते.त्यांच्याकडे स्मार्टफोन देखील नाही.एक सर्वसामान्य माणूस ते थेट गावचे जनतेच्या मनातील सरपंच पदापर्यंत पोहोचले.

आकोलखेड ग्रामपंचायत निवडणूकीत बहुजन पॅनल विरुद्ध विकास पॅनल अशी थेट लढत होती.जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या निवडणूकीत पहायला मिळाली.दिगंबर पिंप्राळे यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उदय झाल्याचे निवडणूकीच्या एकंदरीत चित्रावरून दिसून आले. विकास पॅनलची एक जागा अविरोध झाल्याने १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये १२ सदस्य पदाकरिता निवडणूक झाली. बहुजन पॅनलचे १२ विरुद्ध विकास पॅनलचे १२ व ५ अपक्ष असे एकूण २९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.बहुजन पॅनलला १० जागा मिळाल्या तर विकास पॅनल ला ३ जागांवर समाधान मानावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.