
द प्रोफेशनल करिअर अकॅडमी व राजबोधी बहू.संस्था यांचा सामाजिक उपक्रम…
पातूर प्रतिनिधी..
भारतरत्न, प्रज्ञासूर्य,क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले.आज दि.06 डिसेंबर 2022 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे हारअर्पण व पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे तसेच राजबोधी बहू.संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद प्राथ.मराठी शाळा क्र.१ मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 150 विदयार्थ्यांना लेटर,पेन देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे सहसचिव अविनाश पोहरे,पातूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हर्षल रत्नपारखी, गुप्तचर विभाग कर्मचारी वसंता राठोड,न.प प्राथ मराठी शाळा समिती अध्यक्ष प्रविण पोहरे, उपाध्यक्ष गणेश उगले, राजबोधी संस्थेचे संस्थाध्यक्ष निखिल उपर्वट, सौ. मेघा वडतकार,एन. बी.झाडोकार, आदि उपस्थित होते.