दिव्यांग सक्षमीकरण हाच आमचा ध्यास…

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस निमित्त विशेष वृत्त

इसवी सन 1992 पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघातर्फे अपंगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे.शारीरिक किंवा मानसिक त्रुटी द्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजून घेता याव्यात म्हणून या दिवसाची योजना केली आहे.आपल्या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा हा दिवस.अपंग व्यक्तींच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे,त्याचबरोबर त्यांच्यातील कलागुणांचा साक्षात्कार करून त्यांना जगण्याची उभारी देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपण जे करू शकतो ते सर्वकाही ते ही करू शकतात..म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे. *हीच संधी विदर्भात प्रथमच दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या राष्ट्रीयकृत संस्थेतर्फे उपलब्ध होत आहे. ही संस्था प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांच्या शिक्षण ,रोजगार व आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर आपले कार्य करत आहे*. समाज कल्याण विभागातर्फे आदर्श संस्था पुरस्कार सदर संस्थेला प्राप्त झाला आहे . विदर्भातील पहिले ब्रेल ग्रंथालय संस्थेच्या सहकार्याने अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे . परीक्षा कालावधीत अंध दिव्यांगांसाठी लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक संपूर्ण भारतभर वाचक व लेखनिक पूरवित आहे . रोजगार मार्गदर्शन ,ब्रेल प्रशिक्षण ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,अवयव दान जनजागृती ,संगीत कार्यक्रमाचे आयोजन व महिला सक्षमीकरण अशा विविध उपक्रमातून देश विदेशात संस्थेने ख्याती मिळवली आहे .

संस्थेच्या ०९४२३६५००९० हेल्पलाइन क्रमांकावर दिव्यांग बांधव नोंदणी करू शकतात .स्वयंसेवक म्हणूनही आपण आजच नोंदणी करू शकता .आपल्या सभोवताली असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांना आपण दिव्यांग सोशल फाउंडेशन पर्यंत पोहोचवू शकता, त्यांच्यासाठी सामाजिक व आर्थिक योगदान देऊ शकता.*आपल्या वाढदिवसाला व शुभ प्रसंगी फक्त 365 रुपये देणगी देऊन मदत करू शकता.या निधीतून दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक गरजा पुरवल्या जातात.ज्याद्वारे तो दिव्यांग व्यक्ती स्वयंपूर्ण होऊ शकतो. त्याकरता गुगल पे व फोन पे क्रमांक आहे ०९४२३६५००९० .अधिक माहिती आपण दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या फेसबुक पेज,इंस्टाग्राम पेज व युट्यूब चॅनल च्या माध्यमाद्वारे मिळवू शकता*.

लेखिका: अनामिका देशपांडे

(सदस्य,दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला )

मो. ०९४२३६५००९०

Leave a Reply

Your email address will not be published.