
स्थानिक: अकोला येथे दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल. मा. डी. बि. बोथींगे सर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभलेले अनंतकुमार सरकटे यांनी वसतिगृहाच्या विध्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. स्वप्न हे नेहमी मोठं बघितलं पाहिजे तर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही निदान PSI चं तरी स्वप्न पहायला पाहिजे तेव्हा तरी कुठे तुम्ही पोलीस बनसाल आणि त्यांनी मार्गदर्शन करतांना संगितले Youtube च्या मधमातून त्यांची 50 % अभ्यास केलेला आहे Youtube चा उपयोग हा ज्ञानासाठी , ज्ञान मिळण्यासाठी करा . निश्चितच तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता . परिस्थितीला दोष देऊन तुम्ही काही करू शकत नाही तर हे चुकीचे आहे. आपल्याला परिस्थिती वर मात करता आली पाहिजे. स्पर्धा परीक्षा हे एक असे क्षेत्र आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही शासकीय सेवेत नोकरी करून या समाजाची सुद्धा सेवा करू शकता. विद्यार्थ्यांसोबत बोलतांना त्यांनी वेगवेगळ्या youtube चॅनेलस तसेच वेगवेगळ्या पुस्तकांचा सुद्धा त्यांनी त्या मध्ये संदर्भ दिला. त्यांनी वसतिगृहाच्या सर्व विध्यार्थ्यांना आश्वासन दिले की स्पर्धा परीक्षा संदर्भात परीक्षेच्या अडचणी विषयी जे काही मार्गदर्शन लागेल ते मी करायला तयार आहे असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले अशाप्रकारे कार्यक्रम लाभदायी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे जयकुमार चव्हाण यांनी केले तसेच आकाश ताजने, तसेच ॲड. श्रीकांत वाहूरवाघ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. बी. बोथींगे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि शेवटी पवन जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.