
संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रॅली चे आयोजन
स्थानिक: अकोला जिल्ह्यातील सम्राट अशोक सेना व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. अशोक वाटिका येथून रॅली ला सुरुवात झाली. रॅलीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांची प्रतिकृती तयार करून जनजागृतीसाठी देखावा तयार करून अकोला जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. या रॅली माध्यमातून सविधान जनजागृती झालीच पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार झालाच पाहिजे याकरिता सदर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अकोला जिल्ह्यातील उपासक, उपासिका, सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी मोठ्या संख्येने सहभाग होते.
