अमित वाहुरवाघ यांना तरुणाई फाउंडेशनचा “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार – २०२२” प्राप्त.

स्थानिक :- अकोला, तरुणाई फाउंडेशन कुटासा गेल्या अनेक वर्षांपासून समाजात सातत्याने कार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक आणि युवतींना तरुणाई फाउंडेशनकडून राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार 2022 देवून गौरविण्यात येते. त्यात अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन व समाजपयोगी उपक्रम राबवत युवकांना प्रेरित करून त्यांच्या सोबत व त्यांच्या हातून सत्कार्य घडावे यासाठी झटणारे युवा फाउंडेशनचे अमित वाहूरवाघ यांना आमदार मा. अमोलदादा मिटकरी यांच्या हस्ते “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार 2022” देवून सन्मानित करण्यात आले.

युवा फाउंडेशन सातत्याने संविधान जनजागृती, शिक्षण जागर अभियान आणि फुले,शाहू,आंबेडकर विचार समाजात रुजविण्यासाठी सदैव तत्पर असते. याची दखल तरुणाई फाउंडेशन, कुटासा यांनी घेतली. अमित वाहुरवाघ यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी युवा फाउंडेशन टीम, सार्थक वक्तृत्व अकॅडमी, अकोला व समाजाच्या विविध स्तरावून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.