
स्थानिक: अकोला येथील राहणारकृषी नगर,लेबर कॉलनी रहवासी असणारे ॲड. प्रल्हादजी नामदेवराव शिराळेयांचे दिनांक ०८/११/२०२२ सोमवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ७९ होते.
गेले 18 वर्ष प्रामाणिकपणे ते वकिली व्यवसाय करत होते. परक्राम्य लिखत अधिनियम १८८१ या ‘विनिमय साध्य विलेख नियम १८८१’ (Negotiable Instruments Act, 1881) यामध्ये तज्ञ वकील म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवारात आणि समाजात शोकाकुल वातावरण पसरले आहे. या दुःखातून बाहेर निघण्यासाठी त्यांच्या आप्तेष्टांना बळ मिळो अशी भावना व्यक्त केली जात आहे.