
बोरगाव मंजू येथे कायदे विषयक जनजागृतीच्या! अलोट गर्दीत पार पडला मेळावा
बोरगाव मंजू :- प्रतिनिधी ९ नोव्हेंबरडॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कायद्याच्या संविधाना मुळे व थोर पुरुषांच्या विचारामुळे मी आज न्यायाधीश म्हणून उभी आहो आणि कायदा तुमच्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार असून त्याची योगेरित्या अंमलबजावणी करून कायद्याच्या कसोटीवर उतरून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या, त्याच बरोबर शासनाच्या संपूर्ण योजना तुमच्या हक्काचे व्यासपीठ असून त्या योजनांचा आपण पुरेपूर फायदा घेऊन आपले कल्याण साधावे असे मत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी वेक्त केले. त्याच प्रमाणे अकोला हे संवेदनशील असल्याने इथे एक गाव एक पोलिस ही संकल्पना राबउन संवेदनशील हा शब्द अकोल्याचा बदलून टाकेल आणी सर्वधर्म संमभावाचे ऐक्याचे दर्शन घडवेल असल्याचे मत अकोला पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी वेक्त केले.

स्वातंत्र्याच्या सुवर्ण विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अकोला बार असोसिएशनच्या वतीने बोरगाव मंजू येथे नुकतेच कायदे विषयक जनजागृती मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख श्रीमती सुवर्णा के.केवलेह्हा होत्या तर प्रमुख उपस्थिती अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे, सचिव योगेश पैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजयजी खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसीलदार सुनील पाटील, रजिस्टार सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी विनोद वसु. सरपंच अनिता खेडकर,जि.प.सदस्य नीताताई गवई अकोला जिल्ह्यातील संपूर्ण न्यायाधीश,ना.तहसीलदार महेंद्र आत्राम , ठाणेदार सुनील सोळंके,अमित रायबोले सीडीपीओ अकोला, बोरगाव मंजू मधील पत्रकार , यांच्या सह परशुराम नाईक विद्यालयाचे प्राचार्य तावळे,उप प्राचार्य संजय वाहूरवाघ, शिक्षक, एन.सी.सी.चे विद्यार्थी,ग्रामविकास डॉ.रुपाली पवार, सुपरवायझर वि. भा.नेरकर,आणि अंगणवाडी, सेविका सुजाता बागडे यांच्या कडून मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी यांना बेबे किट देण्यात आली मदतनिस, आशा वर्कर मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, महसूल चे कर्मचारी, आदी उपस्थित होते, या दरम्यान शासकीय योजना चे सर्व प्रकारचे स्टोल लावण्यात आले होते. सर्व सामान्य गोरगरीब जनते सह गरजुंपर्यंत पोहचण्यासाठी माहिती सह मार्गदर्शन करुन लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले,तर प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या विद्यार्थी सहकार्य लाभले तसेच गावकर्याचे आभार मानले.असून यावेळी सूत्र संचालन न्यायाधीश व्ही.एस.खाडवाले,एम.यू. भराडे, यांनी उत्कृष्ट केले.