
२६ नोव्हेंबर रोजी रोजगार आंदोलनात हजारों बेरोजगार सहभागी होणार
जिल्हा प्रतिनिधि: स्थानिक शासकीय विश्राम भवन येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी मा. किरण गुडधे यांच्या नेतृत्वात रोजगार आंदोलन बद्दल नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. या महत्वपूर्ण बैठकीत अमरावती जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक, पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आयोजक मा. किरण गुडधे यांनी बैठकीला संबोधित करतांना म्हटले की, केंद्र सरकार ने ६० लाख रिक्त पदे भरलेली नाही. तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम सरकारचे आहे. परंतु मोदी सरकारची नियत खराब असुन मोठ्या प्रमाणात उद्घाटन, घोषणा होतात पण उद्योग निर्माण होत नाही आणि सरकारी नौकरभरती पण होत नाही. ही सरकारने केलेली एक प्रकारची युवकांसोबत धट्टाच आहे. राज्यात अडीच वर्ष तिघाडी सरकार आणि आताचे डबल इंजिन चे सरकारने ही तेच केलं. अनेक विभागात रिक्त पदे असुनही भरती होत नाही. नौकरभरतीची जाहीरात निघते पण ती वेळेवर रद्द केल्या जाते. उद्योग दुस-या राज्यात पळवली जातात. ठेका पद्धति व आउटसोर्सिंग पदभरती करण्यावर सरकारचा जोर आहे.
बेरोजगारी दर दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे तरुणांनाच पुढे येवुन आपल्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जाहीर बंड करावे लागेल. येणाऱ्या २६ नोव्हेंबर रोजी संयुक्त रोजगार आंदोलन समिति द्वारे देशव्यापी रोजगार आंदोलन होत आहे. अमरावती मध्ये ही हे रोजगार आंदोलन होत असुन बेरोजगार तरुणांनी या आंदोलनात हजारोंच्या शामील होवुन आपल्या मागण्या शासन दरबारी ठेवाव्या.

बैठकीचे संचालन हरिश मेश्राम, आभार राहुल चव्हाण यांनी केले. अध्यक्ष म्हणुन मो. शफी सौदागर, तसेच प्रफुल्ल तायडे, रोशन अर्डक, विनोद गाडे, नारायण चव्हाण यांची आपले विचार मांडले. या बैठकीत नियोजन करण्यात आले की, २६ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन सकाळी १० ते ०५ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार. पम्पलेट बैनर छापुन रोजगार आंदोलनाचा प्रचार करणे, अभ्यासिका, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस येथे जावुन रोजगार आंदोलन ची माहीती देणे. नियोजन समिति, आयोजन समिति, प्रकाशन व प्रसार माध्यम समिति, सोशल मीडिया समिति, निधी संकलन समिति बनविण्यात येईल. या बैठकीत किरण गुडधे, प्रदिप चौधरी, रोशन अर्डक, हरिश मेश्राम, राहुल चव्हाण, मो. शफी सौदागर, विनोद गाडे, शितल गजभिये, ललीता तायडे, अमित गावंडे, नारायण थोरात, नरेंद्र आठवले, प्रेम वानखडे, अजय लांजेवार, संदीप तायडे, राजेश तानोडकर, धनंजय थोरात, मंगेश बनसोड, दिनेश वाटकर, वर्षा आकोडे, नारायण चव्हाण, प्रफुल्ल तायडे, उज्वल वानखडे, दिनेश घाटोळे, झिसन मेहरोज, अतुल मुसळे, प्रदिप आठवले, शिवा चव्हाण आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.