
स्थानिक: अकोला
मंगळवार दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन आम्रपाली बौध्द विहार स्मारक समिती मजलापूर दापुरा यांनी केले आहे. दरवर्षी प्रमाणे ग्रंथ पठण समारोह आणि भगवान बुद्ध मूर्तीस्थापना वर्धापन दिन साजरा करण्यात येत असतो. वर्षावास कालखंडात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि मिलिंद प्रश्न हे महान ग्रंथ विहारात आषाढी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत पठण केल्या जाते आणि हा धम्म श्रवण करण्यासाठी अनेक उपासक उपासिका प्रामुख्यानं उपस्थित असतात.
मजलापूर येथे खूप मोठया प्रमाणात असे सामाजिक कार्यक्रम होत असतात. आणि अनेक मान्यवर ग्रंथवाचक, समाजसेवक या ठिकाणी बोलावल्या जातात ज्यांनी समाज कार्यात स्वतःला वाहून घेतलं अश्या व्यक्तीला सन्मानित सुद्धा या कार्यक्रमात केल्या जाते. या वर्षी विशेष करून दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सर्व समाज बांधव आणि बौध्द उपासक उपासिका यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्रपाली उपासिका संघ, राजश्री शाहू महाराज व्यायाम मंडळ मजलापूर यांनी आव्हान सुद्धा केले आहे.