वंचीतचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांच्या मागणीला यश

बीपीएल, एपीएल आणि अंतोदय धारकांना दिवाळीच्या निमित्ताने जो आनंदाचा शिधा राज्य सरकारने देण्याचा घोषित केले होते तो सामान्य जनतेला मिळाला नसल्याने धान्य आणि दिवाळीची किट मिळण्यासाठी तासंतास लाईन मध्ये उभे राहून देखील मशीन थंब स्वीकारत नसल्याने सामान्यांना नाहक त्रास होत होता. तेव्हा वंचीत चे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी अन्न पुरवठा अधिकारी यांची भेट घेवून सर्व माहिती दिली आणि जनतेच्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत काल वंचितांचा प्रकाश या न्युज पोर्टल ने लावलेल्या बातमीची दखल राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी देखील घेतली अशी माहिती समोर आली.
उद्यापासून दिवाळीची धान्य किटचे तारफैल भागात वितरण करण्यात येईल असे आश्वासन अन्न पुरवठा अधिकारी यांनी दिले आहे. तेव्हा सामान्य नागरिकांकडून वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांचे धन्यवाद व्यक्त केल्या जात आहे.