
गरिबांची देखील दिवाळी आनंदाची जावी यासाठी राज्य शासनाकडून वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा अद्यापही सामान्य जनतेला मिळालेला नाही.
बीपीएल, एपीएल आणि अंतोदय धारकांना दिवाळीच्या निमित्ताने जो आनंदाचा शिधा राज्य सरकारने देण्याचा घोषित केले होते तो अद्यापही सामान्य जनतेला मिळालेला नाही
धान्य आणि दिवाळीची किट मिळण्यासाठी तासंतास लाईन मध्ये उभे राहून देखील मशीन थंब स्वीकारत नसल्याने सामान्यांना नाहक त्रास होत आहे. मशीन थंब घेत नसल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या धान्याचा वाटप देखील करण्यात येणार नसल्याची भाषा कंट्रोल धारक करीत आहे. मुळात मशीन थंब स्वीकारत नसल्यास आधार कार्ड आणि राशन कार्डच्या माध्यमातून पडताळणी करून धान्य देण्यात यावे असे राज्य शासनाच्या गाईड लाईन असून सुध्दा त्या नियमांना फाट्यावर मारत मनमानी कारभार आता अनेक कंट्रोल धारक करताना दिसत आहेत.
यासंदर्भात वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता हा सर्व सर्व्हर चा प्रॉब्लेम असल्याचे सांगितल्या जात आहे. ही अडचण लवकरच सोडविण्यात आली नाही तर आम्ही मोठे आंदोलन करू असा इशारा महेंद्र डोंगरे यांनी दिला आहे.