
*न्यू तापडिया ते खरप रस्त्याकरिता केले आंदोलन*
अकोला महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र. 4 मधील रेल्वे गेट कडून न्यू तापडिया नगर ते खरप या रस्त्याची चाळण झाली असून या रस्तावर वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे. अश्या परिस्थितीत वाहनधारकांना व पायी चालणाऱ्या प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात देखील घडत असून याची वारंवार तक्रार पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनाला करून देखील आजवर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व च्या वतीने या खड्डेमय रस्त्यावर रास्तारोको करून आंदोलन करण्यात आले.
यानंतर देखील प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा ईशारा देखील देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष शँकरराव इंगळे, महासचिव मनोहर बनसोड, माणिक शेळके, सुगत भीमराव तायडे, सचिन गोरले पाटील, अमोल सिरसाट, आशिष सोनोने, दिनेश जगदाळे, इंगळे ठेकेदार, शैलेश देव, साजन अबगड, सुमित ठाकरे, सुरेश कलोरे, नंदू इंगळे, पुरुषोत्तम वानखडे, अंकुश तायडे, सुशील ठाकरे, अजय मस्के, अजय डाबेराव, संजय वानखडे, अशोक जाधव, रमेश प्रधान, किसन वाघमारे, आनंद इंगळे, मिलिंद बनसोड, दिलीप सिरसाट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.