अकोला : (दि ६ ॲाक्टोबर २०२२)
स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नागपूर नंतर अकोल्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या धम्म मेळाव्याला आलेल्या उपासक व उपासीकांना भोजनदान देण्यात आले. ४ क्विंटल व्हेज पुलाव यावेळी वितरित करण्यात आला. कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात हा धम्म मेळावा आयोजीत करण्यात आला होता.मागील २००७ पासुन श्री शिवाजी महाविद्यालयाच्या डॅा बाबासाहेब आंबेकर अभ्यास केंद्राच्या वतीने हा समाजपयोगी उपक्रम संचालक डॅा एम आर इंगळे यांच्या मार्गदर्शनात साजरा केला जात होता त्यावेळी तत्कालीन प्राचार्य डॅा सुभाष भडांगे यांचे सहकार्य लाभत होते. दरम्यान च्या काळात विविध समाजोपयोगी कार्य या केंद्राच्या माध्यमातुन अविरत चालत होते. यामध्ये डॅा बाबासाहेबांच्या दिक्षाभूमीवरील भाषणाला पुस्तक रुपाने प्रकाशीत करुन धम्म अनुयायांना त्याचे वाटप देखील करण्यात आले होते. असे विविध कार्यक्रम राबवीले जात होते.
यावर्षी देखील विद्यमान प्राचार्य डॅा ए एल कुलट, प्रबंधक अशोक चंदन यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थीती लाभली आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. जसजसा जनसागर वाढत होता तसतसा वरुण राजा बरसत होता. इतक्या पावसात देखील मागे न सरता मिरवणुक आणि अनुयायी पुढे जात होते. आणि भोजनाचा लाभ घेत होते. हे विशेष…कार्यक्रमासाठी आजी व माजी विद्यार्थी कृती समीतीचे सिद्धार्थ बागडे, प्रा. राहुल माहूरे, प्रा. आकाश हराळ, आकाश हिवराळे, कुणाल मेश्राम, निरज बडगे, विशाल नंदागवळी, शुभम गोळे, आदित्य बावनगडे, सचिन पाईकराव, रोहित पाटील,सनी उपरवट, योगेश घुगे, प्रतिक सुरवाडे,सूरज तायडे,संदीप गवळी,विशाल तायडे, नितेश वासनिक, भरत चांदवटकर, विनोद टोपले,मयूर गायकवाड,गोलू माने,अभिलाष बडगे, प्रकाश ठाकूर यांनी सहकार्य केले.