हिंगोली प्रतिनिधी:व्यापाऱ्याची तीन कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी २ अकोला येथील चार व्यापाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील मनीष कोटेचा याला हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतरिम अटक पूर्व जामीन मंजूर केला. हिंगोली येथील रहिवासी लक्ष्मीनारायण दामोदरदास मुंदडा यांची आणि त्यांच्या वडिलांची अकोल्यातील चार व्यापाऱ्यांनी ३ कोटी १३ लक्ष रुपयांनी फसवणूक केली असल्याची तक्रार मुंदडा यांनी दाखल केली. सदर फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिसांनी अकोल्यातील दलाला मनीष जैन यांच्यासह चार जणांविरुद्ध कलम १२० (ब) ४०६ आणि ४२० या कलमान्वये फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.
या प्रकरणातील आरोपी मनीष जैन याच्या वतीने अॅड. पप्पू मोरवाल यांनी अटकपूर्व
जामिनासाठी हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल. या अर्जावर सरकार पक्ष आणि
बचाव पक्षाची बाजू ऐकून घेऊन न्यायालयाने मनीष जैनला सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन
मंजूर केला. याप्रकरणी त्यांची बाजू अॅड. पप्पू मोरवाल यांनी मांडली.