1 ली राणी लक्ष्मीबाई मुली/महिला आलं इंडिया आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत अकोला संघाने एकूण 5 पदक प्राप्त केली.

स्पर्धेतील ऋणाली डोंगरे बेस्ट चॅलेंजर अवॉर्डची मानकरी ठरली.
दि-6 ते 10 नोव्हेंबर 2024-भुसावळ येथे पार पडलेल्या 1 ली राणी लक्ष्मीबाई मुली /महिला ऑल इंडिया आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत बॉक्सिंग खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करिता जुनिअर मुलीच्या 50 ते 52 किलो गटात मोक्षदा राऊत सुवर्ण पदक प्राप्त केले. त्यांचबरोबर ऋणाली डोंगरे युथ महिलाच्या 45 ते 48 किलो गटात रजत पदकासोबत(स्पर्धेतील बेस्ट चॅलेंजर बॉक्सर)अवॉर्ड प्राप्त केली.युथ महिलेच्या 51ते 54 किलो गटात रजत पदक प्राप्त केली.
जुनिअर मुलीच्या निशा पाठक 67 ते 70 किलो गटात कांस्य पदक प्राप्त केले.
कॅडेट मुलीच्या 40 ते 42 किलो गटात श्रेया तिवारी कांस्य पदक प्राप्त केले.तसेच अदिती काढणे आणि साईप्रभा काकड यांनी सहभाग नोंदविला.
अकोला संघासोबत कोच म्हणून दिक्षा गवईने काम पहिले.
या सर्व विजेता खेळाडूना मा. श्री.जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीशचंद्र भट सरांचे मार्गदर्शन लाभले.
मा. श्री. जिल्हा क्रीडा अधिकारी साहेब विजेता खेळाडूचे स्वागत केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.