अकोला शहरातील हमजा प्लॉट, जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पपया अहेमद खान, वय २६ वर्ष याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दूखापत पोहचविणे, दूखापत हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे, गृहअतिक्रमण करणे, राहते घरी चोरी करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, गैरनिरोध, आगळिक करून नूकसान करणे, इतरांची जिवीत किंवा व्यक्तीगत सूरक्षितता धोक्यात आणणारी कृती, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पपया अहेमद खान, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यस एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.०६/०५/२०२४ रोजी पारीत करण्यात आले होते.दिनांक ०६/०५/२०२४ रोजी आदेश काढण्यात आले होते. स्थानबध्द इसमास माहीती झाल्याने तो फरार झाला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून शाकीर खान उर्फ पपया अहेमद खान याचा शोध घेवुन आज रोजी मिळून आल्याने त्यास सदरचा आदेश तामील करून दिनांक २१/०५/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. त्याचा स्थानबध्दतेवा कालावधी आज पासुन सुरू झाला आहे.सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. आशिष शिंदे, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन जुने शहर येथील पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सपोनि लांडे, पोउपनि करणकर पोउपनि सुनिल सोयाम, पोलीस अमंलदार संतोष मेंढे, अब्बास अली, शैलेष पाचपोर, श्रीकांत पवार, सागर शिरसाठ स्वप्निल पोधाडे, पवन डांबलकर, निशा वाकडे यांनी परिश्रम घेतले.” अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.