मा. पोलीस अधीक्षक, अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांचे संकल्पनेतुन अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करणेबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करुन जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहिम राबविण्याबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने आज दिनांक २०/०२/२०२४ रोजी अकोला जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावरील गुन्हयात आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहिम राबविण्यात आली असुन मा. पोलीस अधीक्षक, अकोला श्री. बच्चन सिंह सा. यांचे हस्ते ‘राणी महल पोलीस लॉन, अकोला’ येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यादरम्यान एकुण ०६ सोन्या-चांदीचे दागिने अंदाजे किंमत १०.७६ लाख, १९ वाहने अं. किंमत १६.६४ लाख, मोबाईल फोन १४९ अं. किंमत २३.३१ लाख, ऑनलाईन फसवणुक ४ तकारी मधील अं. किंमत ४.५५ लाख व ईतर ७ मुद्देमाल अं. किंमत १.१२ लाख असा एकुण अंदाजे किंमत ५६,५ लाखाचा मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक, सा. यांनी मार्गदर्शन करून भविष्यात आपल्याकडुन काही चुका होणार नाहीत याकरीता खबरदारी म्हणुन काय काळजी घ्यायला पाहीजे, पोलीसा प्रती विश्वास पूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी भविष्यात सुद्धा अशा कार्यकमांचे आयोजन करण्यात येईल, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ताबडतोब पोलीस स्टेशन ला संपर्क करावा असे आवाहन केले. तसेच ऑनलाईन फसवणुक झाल्यास नागरीकांनी तात्काळ National Cybercrime Reporting Portal (NCRP) पोर्टल, तसेच मोबाईल हरवल्यास (Central Equipment Identity Register) CEIR पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल
करावी नागरीकांना दक्ष रहावे याबाबत मार्गदर्शन केले. मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी फिर्यादी सोबत चर्चा केली त्यादरम्यान फिर्यादी नामे निलेश राठी यांनी
मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पोलीसांन प्रति विश्वासाची भावना तयार झाली आहे. असे मताव्दारे पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंतर सुरेश तोता यानी त्यांचा मोबाईल १४ दिवसाच्या आत परत मिळाल्याबददल पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंरत धनराज काळे यांनी पोलीसांनी केलेल्या सहकार्याबददल कौतुक करत कोणताही अनुचीत प्रकार घडल्यास सर्व प्रथम पोलीसांशी संपर्क साधावा असे मत व्यक्त केले. सर्व फिर्यादी यांचे चेहन्यावर मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद होता. व पोलीसांच्या चेहन्यावर केलेल्या
कर्तव्याप्रती समाधान दिसत होते. सदर कार्यक्रमाला श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, प्रमुख उपस्थिती होती. सर्व पो.स्टे. वे मुद्देमाल मोहरर व तकार दार होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पो. नि. श्री. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली. आभार प्रदर्शन श्री. सतिष कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधीकारी शहर विभाग यांनी केली. तर सुत्र संचालन
पोहवा. गोपाल मुकुंदे स्था. गु.शा. अकोला यांनी केले.
सदर कार्यक्रमांचे यशस्वी करीता सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.स्टे. थे मुद्देमाल मोहरर, तसेच पो.नि. योगेश संखे बिनतारी संदेश विभाग, राखीव पोलीस निरीक्षक, श्री. गणेश जुमनाके, फोटो ग्राफर सतिष फोकमारे, पोहवा. दत्तात्रय ढोरे, पो. कॉ. गणेश धुंपटवाड, कुंदन खराबे यांनी पार पाडली. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.