दिनांक २३ फेब्रु. २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनंतर डीसेंबर मध्ये नविन कायदयांना मंजुरी मिळाली असुन भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नविन कायदे १ जुलै २०२४ पासुन लागु झालेले आहेत. अदखलपात्र गुन्हा, दुखापत, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, खुन करणे, कटकारस्थान करणे, चोरी व दरोड्या सारख्या गुन्हयांच्या कलमात बदल झालेला आहे.
नविन कायदयामध्ये बदल करण्यात आल्या नुसार अकोला जिल्हयातील सामान्य नागरीकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवु नये याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील २३ पोलीस स्टेशन अंतर्गत नविन कायदयाविषयक जनजागृती व्हावी म्हणुन २३ कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये प्रतिष्ठीत नागरीक, प्राध्यापक, महीला, युवक, विद्यार्थी तसेच पत्रकार यांना सहभागी करण्यात आले व नविन कायदयाविषयी जागृती करण्यात आली तसेच त्यांचे प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
दिनांक ०१ जुलै २०२४ पासुन अंमलात आलेल्या तीन नविन कायदयाबाबत अकोला पोलीस दल सज्ज झाले असुन १ जुलै २०२४ पासुन अकोला जिल्हयात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हया तीन नविन कायदयाप्रमाणे कामकाज करणे सुरू झाले असुन दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी नविन कायदयानुसार अकोला जिल्हयात भाग १ ते ५ चे एकुण ४ गुन्हे दाखल झाले असुन भाग ६ वे एकुण २ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नविन कायदयाप्रमाणे एकुण ३ अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.
दिनांक ०२ जुलै २०२४ रोजी नविन कायदयानुसार अकोला जिल्हयात भाग १ ते ५ चे एकुण ९ गुन्हे दाखल झाले असुन भाग ६ वे एकुण २ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नविन कायदयाप्रमाणे एकुण २ अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. असे दिनांक १ जुलै २०२४ पासुन नविन कायदे अस्तीत्वात आल्यापासुन नवीन कायदयानुसार भाग १ ते ५ वे १३ गुन्हे, भाग ६ चे ०४ गुन्हे आणि अकस्मात मृत्यु ०५ अकोला जिल्हयात दाखल झाले आहेत.
वरील प्रमाणे दररोज नविन कायदयानुसार गुन्हे दाखल होत असुन नविन कायदयाप्रमाणे कामकाज करण्यात येत आहे. अकोला पोलीस दल अविरत जनतेच्या सेवेत तत्पर आहे.






