खडकपूर्णा जलाशयामध्ये 03 बोटी जिलेटीनच्या साह्याने उडविल्या..

सिंदखेडराजा व बुलढाणा उपविभागाची संयुक्त कारवाई

स्थानीक:- अकोला

मा.जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोध पथकाच्या साहाय्याने खडकपूर्णा जलशयात आज दिनांक 22/1/2025 ला सकाळी 9.00 वाजेपासून अवैधरित्या वाळू उपसाकरणाऱ्या बोटीची शोध मोहीम प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा, शरद पाटील उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांच्या नियंत्रणामध्ये वैशाली डोंगरजाळ तहसीलदार देऊळगावराजा व संतोष काकडे तहसीलदार चिखली यांच्या पथकाने 03 बोटी जिलेटिन च्या साह्याने उडविण्याची कारवाई करण्यात आली आहे.

खडकपूर्णा जलाशयामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा करणा-या बोटी टाकून ज्यांच्या साहाय्याने वाळू उपसतात अशा बोटी नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिले त्यानुसार आज दिनांक 22/01/2025 ला शोध पथकाची बोट व ड्रोन च्या साहाय्याने धरणाची पाहणी करण्यात आली, त्यामध्ये सिनगाव जहागीर येथे 01 फायबर बोट 01 छोटी इंजीन बोट आढळून आली तसेच सदर बोटीवर छत्तीसगड राज्यातील 03 मजुर यांच्यावर पोलिस स्टेशन देउळगावराजा येथे ग्राम महसुल अधिकारी सिनगाव जहाँगीर श्री मधुकर उदार यांच्या मार्फत् गुन्हा दाखल करण्यात आला त्यांचे नावे 1. साफीकूल शेख इरफान शेख वय 32 वर्षे 2. समुल शेख नजरुल शेख वय 34 वर्षे रा पियारपुर ता राधानगर, जि. साहेबगंज, राज्य छत्तीसगड 3. मी सावा करीम मो आबु बक्कर वय 25 वर्षे रा बेगमगंज ता राधानगर, जि साहेबगंज, राज्य छत्तीसगड अशी आहेत. सदर मजुरांनी अवैधरित्या उपसा केलेली रेती सुद्धा सदर बोटीमध्ये आढळून आली त्यावरून सदर मजुराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे तसेच सदर दोन्ही बोटी जिलेटिन च्या साह्याने उडवुन त्यांचे नुकसान करण्यात आले तसेच ड्रोनच्या साह्याने इसरूळ व बायगावच्या मध्यभागी एक बोट आढळून आली. ती बोट सुद्धा जिलेटिन च्या साह्याने उध्वस्त करण्यात आली अशाप्रकारे तीन बोटींवर कारवाई करण्यात आली, यामध्ये तीन बोटीची किंमत अंदाजे 30 लक्ष रुपये आहे.

तसेच यापूर्वी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जिल्हाधिकारी जालना यांना पत्र देऊन खडकपूर्णा जलाशयातील बोटींवर संयुक्तपणे कारवाई करण्याबाबत विनंती केली होती. आज दिनांक 22 जानेवारी 2025 च्या कार्रवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जाफ्राबाद तालुक्याच्या तहसिलदार सारीका भगत यांच्याशी संपर्क साधून या भागातून पळून गेलेल्या बोटी जाफराबाद हददीमध्ये मध्ये आढळुन आल्यास, त्यांची अडवणूक करून त्यांच्यावर कारवाई करावी असे सांगीतले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या भागात गेलेल्या जवळपास सहा बोटीवर कारवाई केल्याची माहिती तहसीलदार सारिका भगत यांनी उपविभागीय अधिकारी यांना कळविली आहे. अशाप्रकारे दोन्ही जिल्ह्यांमधून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. सदरील कारवाई मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा किरण पाटील यांच्या निर्देशानुसार, प्रा. संजय खडसे, मा. उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा व शरद पाटील, मा. उपविभागीय अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषा कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी देउळगावराजा, वैशाली डोंगरजाळ, तहसिलदार देउळगावराना, संतोष काकडे तहसिलदार चिखली, संतोष महल्ले ठाणेदार देउळगावराजा, सायली जाधव, नायब तहसीलदार महसुल देउळगावराजा, पि पि घोटकर, नायब तहसीलदार निवडणुक देउळगावराजा, डी बी नरवाडे PSI पोलिस स्ट्रेशन् देउळगावराजा व पथकातील मंडळ अधिकारी एम एल वायडे, विजय हिरवे, अरविंद शेळके, नारायण सोनुने, ग्राम महसूल अधिकारी राजु तागवाले, सुमित जाधव, श्रीमंत पांडव, श्री चव्हान, श्री कटारे, आकाश खरात, संजय हांडे, मधुकर उदार, अनिल बोंद्रे, किशोर सोळंके, वाहन चालक कैलास चव्हान, महसुल सेवक सचिन बंगाळे, विठठल हरणे यांच्या मार्फत करण्यात आली. सदरील कारवाईमध्ये शोध व बचाव पथकाचे ए एस आय श्री तारासिंग पवार, पोलिस कॉ पाटील व त्यांच्या टिम हजर होती.यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननचा प्रयत्न झाल्यास जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाचे मार्फत अवैध उत्खननाबाबत वारंवार कारवाई करण्यात येईल. तसेच जे शेतकरी रेतीचे अवैध उत्खननास रस्ता उपलब्ध करुन, अवैध रेतीसाठा करण्यास सहाकार्य करतील त्यांच्या 7/12 वर याबाबतचा बोजा चढविण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक होवु नये यासाठी गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.