
अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडलेल्या व्यापारी सुफीयान खान हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अवघ्या १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्येचा उलगडा करत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घटनेचा धक्कादायक प्रकार
फिर्यादी शेहरे आलम (रा. शिवणी, अकोला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी सुफीयान खान, साजीद खान आणि कैफ खान हे तिघेजण कारने रेल्वे लाइन बोगदा, मलकापूर परिसरात गेले होते. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. “इकडे मुलगी घेऊन आला आहे का?” असा सवाल करत आरोपींनी सुफीयान खानवर लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुफीयानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार साजीद गंभीर जखमी झाला आहे.
तपासाची वेगवान गती
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रात्रीच घटनास्थळाला भेट देत तपास सुरू केला. परिसर निर्जन असून कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अथवा ठोस सुराग उपलब्ध नसतानाही पोलिसांनी गुप्त माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध लावला.
सहा आरोपी ताब्यात
तपासादरम्यान आरोपी फैजान खान, अब्दुल अरबाज, शोएब अली यांना अकोला शहरातून तर शेख अस्लम, सैय्यद शहबाज उर्फ सोनू आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना शेगाव (जि. बुलढाणा) येथून ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी खदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही:–
मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. बी. चंद्रकांत रेड्डी सा. यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, स.पो.नि गोपाल डोले, पोउपनि. विष्णु बोडखे, पोउपनि. माजीद पठान खान, श्रेणी पोउपनि दशरथ बोरकर, पो. हवा. शेख हसन, फिरोज खान, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, सुलतान पठाण, किशोर सोनाने, रविद्र खंडारे, खुशाल नेमाडे, उमेश पराये, एजाज अहमद, भास्कर धोत्रे पो. कॉ अभिषेक पाठक, आकाश मानकर, राज चंदेल, मो. आमीर, श्रीकात पातोंड, अशोक सोनवणे, स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, स्वप्निल चौधरी, राहुल गायकवाड, चालक पो. हवा. प्रशांत कमलाकर, देवानंद सारात, प्रविण कश्यप यांनी केली.