🚨 गोवंश तस्करांवर पोलिसांचा ‘प्रहार’ | अकोल्यात मोठी कारवाई | २३ गोवंशांची सुटका | २३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त 🚨

अकोला | प्रतिनिधी |

अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेने भल्या पहाटे जोरदार धडक कारवाई करत २३ गोवंश जनावरांची सुटका केली. दोन मालवाहू वाहने आणि एक मोटारसायकलसह २३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


🐄 निर्दयपणे कोंबलेले २३ गोवंश वाचवले

नागपूरवरून समृद्धी महामार्गाने अकोल्याकडे येणाऱ्या दोन पिकअप गाड्यांत निर्दयतेने कोंबून गाय, गो-हे व कालवडी कत्तलीसाठी आणल्या जात होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी सापळा रचत जुने शहर हद्दीत नाकाबंदी करून ही वाहने ताब्यात घेतली.


🚚 पकडलेली वाहने व जप्त मुद्देमाल:

पिकअप वाहन क्र. MH 30 BD 5686 (₹८,५०,०००)

पिकअप वाहन क्र. MH 31 FC 2489 (₹८,५०,०००)

दुचाकी क्र. MH 30 BP 8072 – HP Shine (₹१,००,०००)

२३ गोवंश जनावरांचे मूल्य (₹५,७५,०००)

एकूण मुद्देमाल: ₹२३,७५,०००


👮‍♂️ अटकेत आरोपी – दोघे अटकेत, दोन फरार

सकलेन मुस्ताक मोहम्मद आरीफ कुरेशी, वय २५, मच्छी मार्केट, ताजनापेठ, अकोला

लोकनाथ मुन्नास्वामी पिल्ले, वय २५, कोळसा टाल, कामठी, जि. नागपूर

फरार आरोपी –
१. गुल मोहम्मद शेख बाबु, वाशिम बायपास, अकोला
२. मोहम्मद अल्तमश मोहम्मद हबीब (कुरेशी), मच्छी मार्केट, अकोला

सर्व आरोपींवर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.


🐂 वाचवलेली जनावरे कुठे?

सुटका करण्यात आलेली गोवंश जनावरे ‘आदर्श गौसेवा संस्था, म्हैसपूर’ येथे उपचार, देखभाल व संगोपनासाठी हलवण्यात आली आहेत.


👮 पुढील कठोर कारवाईचा इशारा

पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, “गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध भविष्यातही अधिक कठोर कारवाई केली जाईल.” जिल्ह्यात अशा अवैध गोवंश वाहतुकीवर कायम लक्ष ठेवले जाईल.


या धडक कारवाईत सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, माजीद पठाण, विनोद ठाकरे, तसेच अंमलदार शेख हसन, उमेश पराये, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, श्रीकांत पातोंड, धीरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर यांनी सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली.



Leave a Reply

Your email address will not be published.