शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा उपक्रम देवकाबाई देशमुख काॅन्व्हेंट शाळेत

मलकापूर, अकोला | दि.
डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर वेगाने वाढला असतानाच त्यासोबत सायबर गुन्ह्यांचं सावटही झपाट्याने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी देवकाबाई देशमुख काॅन्व्हेंट, मलकापूर येथील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं.
कु. अदीती जानोरकर हिने सोशल मिडिया वापरताना घ्यावयाची काळजी, स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम वापरताना कोणती माहिती शेअर करू नये, फेक लिंक, पिशिंग वेबसाईट यापासून कशी खबरदारी घ्यावी याचे सोप्या भाषेत उदाहरणांसह विवेचन केले. “चार्जिंग करताना अनोळखी चार्जर वापरल्यास तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो,” असे सांगत तिने तांत्रिक बाबीही सहजपणे समजावून दिल्या.
तसेच कु. तनुजा घोगरे हिने ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना OTP, UPI लिंक, कॉलिंग फ्रॉड पासून कसे सावध राहावे यावर मार्गदर्शन केले. “स्वतःचा फोटो DP वर न ठेवण्याचा सल्ला विशेषतः मुलींनी लक्षात घेण्यासारखा आहे,” असेही तिने नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका पोकळे मॅडम होत्या. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांच्या मनात सायबर क्राईमबाबत प्रश्न निर्माण झाले असताना विद्यार्थिनींनी मार्गदर्शन करत त्यांच्या शंका दूर केल्या. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी जागरूकतेचा अनमोल अनुभव ठरला.