“ऑपरेशन प्रहार”च्या धडाक्यात अकोट फाईल पोलिसांना सापडलेलं गावठी दारूचं विळखं, पण याच प्रकारच्या अड्ड्यांवर वर्षानुवर्षे डोळेझाक का?

अकोला |(प्रतिनिधी)
“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात फरीद नगर, नायगाव येथे अचानक धाड टाकण्यात आली. या धाडीत भिकन बुद्धू नौरंगाबादी हा आरोपी गावठी हातभट्टीवर दारू गाळताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याकडून ३०० लिटर मोवा माश, १०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली असून, एकूण मुददेमाल ५४,०००/- रूपये किमतीचा आहे.
पण खरा सवाल आहे – एवढा मोठा अड्डा इतक्या दिवसांपासून पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला?
Table of Contents
❗गोपनीय माहितीचा आधार – पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल?
ही कारवाई सामान्य गस्तीतून नव्हे, तर गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. म्हणजेच, स्थानिक गुप्तचर माहिती संकलनात पोलिसांची पूर्णपणे कुचकामी भूमिका उघड झाली.
🔥 हातभट्टीचा अड्डा पोसणारे कोण?
हा अड्डा अचानक उगम पावलेला नाही.
संपूर्ण यंत्रणा आणि स्थानिक ‘संरक्षण’ नसल्यास, अशा प्रकारचे अवैध धंदे वर्षानुवर्षे चालू शकत नाहीत.
अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या अड्ड्यावर याआधी कारवाई का झाली नाही?
🕵️ “ऑपरेशन प्रहार” की “ऑपरेशन प्रचार”?
सामान्य जनता विचारते:
केवळ एक कारवाई म्हणजे यंत्रणा यशस्वी झाली असं समजायचं का?
ज्यांच्या आडून, दबावातून किंवा खाकी आशीर्वादातून हे अड्डे वाढले, त्यांच्यावर कधी कारवाई होणार?
🎤 कोण आहे राजकीय अभय देणारा?
झोपडपट्टीत, वस्तीगृहांत, कामगार वस्त्यांत दारूने घरं उद्ध्वस्त होतात… पण त्यातून आर्थिक लाभ घेणारे अजूनही सावलीत सुरक्षित आहेत.
राजकीय ‘संरक्षक’ कोण?
पोलीस आणि राजकारण्यांमधील ‘सामंजस्य’ किती खोल आहे?
👥 कारवाईत सहभागी अधिकारी –
सदर कारवाईत पोलिस निरीक्षक शेख रहीम, उपनिरीक्षक तनुजा खोब्रागडे, एएसआय अनिस पठाण आणि त्यांच्या चमूने सहभाग घेतला.
मात्र, ही कारवाई म्हणजे “शिकारी गेला शिकारीला” की, पोलिसांचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न?
🛑वंचितांचा स्पष्ट सवाल:
“दारू विक्रेत्यांची मुळे खोदणार की नाही?”
“स्थानिक संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट साखळीवर सरकार हात टाकणार का?”
“पोलीस ठाण्याच्या परिसरातच अड्डे असतील, तर नागरिक कुणाकडे धावतील?”
ही केवळ एक कारवाई नव्हे –
ही संपूर्ण सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या अपयशाची झलक आहे.